Ad will apear here
Next
‘कँटोन्मेंट बोर्डमधील रस्ते नागरिकांसाठी तातडीने उघडणार’
पुणे : ‘विस्तृत आढाव्यानुसार पुणे शहराच्या हद्दीतील कँटोन्मेंट बोर्डमधील रस्ते नागरिकांसाठी तातडीने उघडणार असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी मान्य केले असून, यापुढील काळात रस्तेसंबंधी सर्व स्थानिक प्रतिनिधी आणि संरक्षण मंत्रालयातील मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन पुढील काळात रस्ते वापरासंबंधी कार्यवाही करण्याचेही निश्चित झाले आहे,’ अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.

पुणे शहराच्या हद्दीतील कँटोन्मेंट बोर्डातील रस्ते वापरावरील बंदीसंदर्भात नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदार शिरोळे यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे जून २०१६पासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर देखील याचविषयी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही पाठपुरावा चालू होता; तसेच पर्रीकर, भामरे यांच्यासमवेत शिरोळे यांनी या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. याचसंदर्भात मध्यंतरी देशभरातील कँटोन्मेंट बोर्डाच्या विविध प्रश्नांसंबंधी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे देशातील ६३ बोर्डांच्या लोकप्रतिनिधींबरोबर दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली चार मे २०१८ रोजी बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत पुणे शहरातील कँटोन्मेंट बोर्डांच्या विविध प्रश्नांसंबंधी खासदार शिरोळेंनी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी आणि देहूरोड बोर्डाचे अभय सावंत यांच्यासमवेत दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीताराम यांची भेट घेऊन बोर्डांच्यासंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा देखील केली होती. या बैठकीनंतर संरक्षण मंत्रालयातील प्रशासकीय पातळीवर या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील टप्प्यात प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती खासदार शिरोळेंनी भेटीनंतर बोलताना दिली होती.

त्यानुसार झालेल्या विस्तृत आढाव्यानुसार कँटोन्मेंट बोर्डमधील रस्ते नागरिकांसाठी तातडीने उघडणार असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी मान्य केले असून, यापुढील काळात रस्तेसंबंधी सर्व स्थानिक प्रतिनिधी आणि संरक्षण मंत्रालयाल मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन पुढील काळात रस्ते वापरासंबंधी कार्यवाही करण्याचेही निश्चित झाल्याचे खासदार शिरोळे यांनी सांगितले; तसेच मागील दोन वर्षांहून अधिक काळ घेतलेल्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल शिरोळेंनी समाधानही व्यक्त केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZOTBO
Similar Posts
पुणे कँटोन्मेंच्या मागण्यांसंदर्भात खासदार शिरोळेंचा पाठपुरावा पुणे : पुणे आणि खडकी कँटोन्मेंट विभागाचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या प्रश्नांवर तोडगा निघावा यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी संरक्षण मंत्रालयाच्या केंद्रित समितीसमोर मागण्या मांडल्या आहेत.
पुणे कँटोन्मेंटचे प्रश्न सोडविण्यासाठी शिरोळेंचा पुढाकार पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि खडकी कँटोन्मेंट विभागाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, संरक्षण मंत्रालयाच्या केंद्रित समितीसोबत पुण्यात यासंदर्भात १२ नोव्हेंबर २०१८ रोजी एक बैठक झाली
दिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप पुणे : खासदार अनिल शिरोळे यांच्या स्थानिक विकास निधीतून दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरचे वाटप करण्यात आले. शिरोळे यांच्या हस्ते दत्ता मिरगणे आणि युवराज नवले या दिव्यांगांना या स्कूटर प्रदान करण्यात आल्या. या वेळी दिव्यांग संघाचे अध्यक्ष दादा आल्हाट, मारुती गिरमे, मोमीन नवले, धनंजय देशमुख, रघुनाथ तिखे आदी उपस्थित होते
खासदार शिरोळेंच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान पुणे : शौर्य दिनाचे औचित्य साधून सीमेवर लढता लढता वीरमरण आलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचा व वीरपत्नींचा सन्मान खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला. येथील स्व. सौ. हिराबाई शिवाजी गलांडे फाउंडेशन व नॅशनल एक्स सर्व्हिसमेन को ऑर्डिनेशन कमिटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language